![]() |
मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कला क्रीडा पुरस्कार स्वीकारताना मारुती प्रकाश गुरव |
कुदनूर : सी एल वृत्तसेवा
नांदुरे, ता.चंदगड येथील मारुती प्रकाश गुरव यांना होनाई न्युज व शिवधनुष्य युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२५-२६ मधील राज्यस्तरीय शिव धनुष्य उत्कृष्ट कलाकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गुरव यांच्या सामाजिक, तसेच कला क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, सिने अभिनेत्री प्रतीक्षा जाधव, कार्यक्रमाचे आयोजक व होनाजी न्यूज चे संपादक अधिकराव लोखंडे, उप संपादक मनोज यादव, अंकुश कुंडले, शिवसेना तालुका प्रमुख संजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment