आजरा: गोपाळ गडकरी / सी एल न्यूज
विज वितरण कंपनी आजराकडून बंद असलेल्या शेतीपंपाना तसेच ज्या शेतकऱ्यांचे ३ व ५ एच पी मोटर आहे अशा शेतकऱ्यांना १० एचपी. अवाच्यासव्वा वीज बिले देऊन त्यांच्यावर कारवाईची नोटीस पाठवून अन्याय केला आहे. शासनाने ७.५ एचपी पर्यतच्या शेती वीज बील माफ केले आहे. असे असताना सुद्धा शेतकऱ्यांना अवाजवी बिले पाठविले आहेत. ती भरली नाहीत तर कारवाहीची नोटीस पाठवून नाहक बदनामी करण्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने केला आहे.
अशा शेतकऱ्यांना अंदाधुंद वीजबीले देऊन कारवायीची नोटीस बजावल्यामुळे शिवसेना उबाठा आजरा तर्फे उपअभियंता महावितरण कंपनी शाखा - आजरा यांना निवेदन देऊन तक्रारीचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या समस्यांचे निराकरण व समाधान झाले नाही तर आजरा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळा निवेदन देतेवेळी संभाजी पाटील - (उपजिल्हा प्रमुख उबाठा), युवराज पोवार (तालुका प्रमुख,) समीर चांद (उपशहरप्रमुख,) शिवाजी आढाव (उपतालुका प्रमुख), दिनेश कांबळे, संकेत सावंत, सुरेश कांबळे, स्वप्नील शिंदे, महेश पाटील, रविंद्र सावंत, हुसेन मुराद आदि शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment