चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बेरडवाडा (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत प्रवेश पंधरवडा मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांनी विविध उपक्रमांनी साजरा केला. १५ जून पूर्वी शाळेत दाखल पात्र व दाखल मुलांच्या पालकांच्या भेटीगाठी घेवून जि.प.शाळेतील शिक्षणाचे महत्व पटवून देवून १००% पटनोंदणी तील मुले १००% शाळेत दाखल करुन घेतली. सर्व मुलांना अंकलिपी, वह्या, पेन असे शैक्षणिक साहित्य स्वखर्चाने वाटप केले. बेरडवाडा शाळेत दाखल पालकांचे कौतुक व स्वागत केले.
सर्व मुलांना शिरा व फळांचे वाटप करुन प्रत्येक दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. सत्यमेव सेवा फौंडेशन मुंबई -कोल्हापूर,गडहिंग्लज च्या वतीने प्रती विद्यार्थी १२००/- रु.शैक्षणिक साहित्य- दप्तर, एक डझन वह्या, पाण्याची बॉटल, रंगपेटी, ड्राईंगवही, पेन-पेन्सिल असे साहित्य मिळवून देणे साठी प्रयत्न केले. २१ जून जागतिक योगदिन शालेय कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक, उपाध्यक्षा मिनाक्षी नाईक, सरपंच किरण नाईक, पालक, विद्यार्थी यांचे उपस्थित उत्तम रितीने साजरा करणेत आला.
पालक व शेतकऱ्यांना वृक्ष आपल्या दारी उपक्रम राबवून सुमारे -२००००/- किंमतीची २०० काजूची व फळझाडे,फुलझाडे यांचे वाटप आले. आणि शासनाच्या शतकोटी वृक्षारोपण व संवर्धन उपक्रमास प्रेरणा दिली.भटक्या समाजातील पाटणे फाटा, हलकर्णी परिसर व चंदगड-नागनवाडी परिसरातील ४० गरजू कुटूंबांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक साहित्य-रवा, साखर, तांदुळ, ब्रेड, बिस्किटे, डेटाल साबण अशा साहित्याचे वाटप व दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप बाबुराव वरपे यांनी करुन त्यांना प्रेरित केले. बेरडवाडा शालेय आवारात एक पेड मॉ के नाम उपक्रमांतर्गत फुल झाडे व वृक्षारोपण करुन विद्यार्थ्यांना व मातांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले.
सदर उपक्रमासाठी प्रेरणा व मार्गदर्शन चंदगड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील, प्रभारी गटशिक्षण अधिकारी सौ. सुमन सुभेदार, शिक्षण विस्तार अधिकारी सुनित चंद्रमणी, शिक्षण विस्तार अधिकारी, दाटे केंद्र मुख्याध्यापक विश्वनाथ गावडे, शिक्षकवृंद दाटे, सरपंच किरण नाईक, शालेय कमिटी वि.मं.बेरडवाडा, सौ. शारदा वरपे, साहील वरपे व सायली वरपे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment