आमदार सतेज पाटील यांच्या कडून व्यंकटराव प्रशालेला १२ कॉम्प्युटर प्रदान.. - चंदगड लाईव्ह न्युज

25 June 2025

आमदार सतेज पाटील यांच्या कडून व्यंकटराव प्रशालेला १२ कॉम्प्युटर प्रदान..

 


आजरा : सी एल वृत्तसेवा 

        आजरा या तालुक्याच्या ठिकाणी खेड्या-पाड्यातील, वाडी- वस्तीतील, बहुजन समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुलां- मुलींनी चांगले दर्जेदार शिक्षण घ्यावे. या हेतूने 1932 साली स्थापन झालेल्या आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा या संस्थेचे अध्यक्ष म्हणून जयवंतराव शिंपी यांनी व्यंकटराव शिक्षण संकुलात शैक्षणिक व भौतिक सुविधा वाढवत नेत आज इयत्ता पहिली  पदवीपर्यंतचे शिक्षण एकाच छताकाली आणले आहे( प्राथमिक, हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज व महाविद्यालय)

        आजच्या प्रगतशील आधुनिक जमान्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान मिळणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे यासाठी  शाळेत आय. टी. लॅब आहे पण त्यामध्ये विद्यार्थ्यांना पुरेसे कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचे ज्या वेळेला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना कळविले, लागलीच त्यांनी  व्यंकटराव शिक्षण संकुलातील होतकरू व गोरगरीब विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे अध्ययावत ज्ञान मिळालेच पाहिजे या उदात्त हेतूने शाळेसाठी डेल कंपनीचे आद्यावत आय फाईव्  १२ कॉम्प्युटर संच भेट दिले.

     या कॉम्प्युटर संचांचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष श्री एस पी कांबळे, सचिव श्री अभिषेक शिंपी, खजिनदार  सुनील पाटील, संचालक श्री कृष्णा पटेकर, श्री सचिन शिंपी,श्री विलास पाटील, व्यंकटराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष शेळके , ज्युनियर कॅालेज व हायस्कूल चे नूतन प्राचार्य  एम एम नागुर्डेकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक रणजीत देसाई, ज्युनियर कॉलेज व्यवस्थापक एम. ए. पाटील व  व्यंकटराव परिवारातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment