चंदगड येथे नाट्यगृह उभारणार - नगराध्यक्ष सुनील काणेकर, चंदगड येथे नाट्य कलाकारांची सहविचार सभा - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2026

चंदगड येथे नाट्यगृह उभारणार - नगराध्यक्ष सुनील काणेकर, चंदगड येथे नाट्य कलाकारांची सहविचार सभा

 

चंदगड येथे कलाकारांच्या मेळाव्याचे उद्घाटन करताना नगराध्यक्ष सुनील काणेकर. शेजारी बाळकृष्ण मालुसरे, अमेय सबनीस, ललिता बर्वे, अनिल गावडे, सुरेश दळवी, प्रा. ए. डी. कांबळे आदी.

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

 चंदगड तालुका नाट्य, सीनेमा, रंगभूमी कलाकारांची खाण आहे. तथापि चंदगड शहर किंवा तालुक्यात कुठेही नाट्यगृह नाही. ही कमी भरून काढण्यासाठी चंदगड येथे सर्व सोयींनी युक्त नाट्यगृह उभारणार असून प्रस्ताव शासनाकडे दिल्याची माहिती चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर ‌यांनी दिली.

चंदगड येथे कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ग्रामीण नाट्य कलाकारांच्या सहविचार सभेत उद्घाटक या नात्याने ते बोलत होते.

    जीवन जगावे, पण कसे जगावे हे कला शिकवत असते. या कलेमुळेच मनुष्याचे जीवन घडते. ही कला जिवंत राहण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी पुढे येणे गरजेचे आहे. चंदगड येथे शासनाच्या माध्यमातून नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला आहे, तसेच कलाकारांना मानधन मिळावे यासाठी आमदार शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याची माहिती चंदगडच्या नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी दिली.

 येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या सभागृहात कोल्हापूर, बेळगाव, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा जिल्ह्यातील ग्रामीण नाट्य कलाकारांची सहविचार सभा झाली.

नाट्य परंपरेचे जतन करण्यासाठी ग्रामीण नाट्य कला मंच, कोल्हापूर’ यांच्यावतीने ही सभा घेण्यात आली.

  व्यासपीठावर नगरसेवक अमेय सबनीस, अभिनेत्री ललिता बर्वे, सुरेश पाटील, मंचचे अध्यक्ष बाळकृष्ण मालुसरे, खजिनदार अनिल गावडे, नारायण गडकरी, सुरेश दळवी, प्रा. ए. डी. कांबळे, अनंत गावडे, दत्ता दळवी होते.

यावेळी प्रा. ए. डी. कांबळे मार्गदर्शन केले. यावेळी सहदेव कांबळे, अनिल गावडे, सुरेश दळवी, आनंद गावडे, प्रदीप यादव, नवनाथ कोकीतकर, सुरेश पाटील, धनंजय गुरव, पांडुरंग प्रधान, दत्ता दळवी, अनंत दळवी, मोहन गावडे यांनी भाषणे केली.

No comments:

Post a Comment