चंदगड : प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील सकल मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसह बेळगाव जिल्हा व कुंरदवाड संस्थानातील कुणबी शोध मोहिम सुरू करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी सकल मराठा समाज, चंदगड तालुक्याच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता तुर्केवाडी येथील महादेवराव वांद्रे कॉलेजमध्ये होणार आहे. बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत तसेच बेळगाव जिल्हा व कुंरदवाड संस्थानातील कुणबी नोंदींच्या शोध मोहिमेबाबत चर्चा व विचारविनिमय करण्यात येणार आहे.
या बैठकीस चंदगड तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment