तुडये येथील रामलिंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रोला भेट - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2025

तुडये येथील रामलिंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रोला भेट

तुडये येथील रामलिंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रोला भेट दिली त्या वेळचा क्षण

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    तुडये (ता. चंदगड) येथील श्री रामलिंग हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या विद्यार्थी व शिक्षक यांनी शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने "मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान " (space technology in the service of humankind) हे ब्रिदवाक्य उराशी बाळगून कार्य करणाऱ्या इस्रोच्या U R. Rao satellite centre Bangalore येथे भेट दिली.

        या संस्थेत काम करणारे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. व्ही. एन. मूर्ती यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधतांना अतिशय सोप्या इंग्रजी भोषेतून ISRO बद्दल माहिती दिली व इस्रोमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहीत केले. श्री रामलिंग हायस्कूल व ज्युनि. कॉलेज तुडयेच्या इतिहासात अशा संस्थेला भेट देणारी  ही पहिलीच शैक्षणिक सहल ठरली.

       यासाठी  संस्थेचे सचिव राजेश पाटील व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभले. ISRO ची परवानगी मिळविण्यासाठी जेष्ठ शास्त्रज्ञ श्री. श्रीनिवासन तसेच प्राचार्य आर. डी. पाटील यांचे मौलिक सहकार्य लाभले. तसेच विज्ञान शिक्षक आर. झेड. पाटील गणित शिक्षक पी. आर. ओऊळकर यांनी इस्त्रोंच्या परवानगीसाठी व विद्यार्थ्याच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोण जागृत व्हावा यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच समाज व बालकल्याण मंत्री लक्ष्मीताई हेंबाळकर अक्का यांचे कर्नाटक विधानसौधचे कामकाज पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना परवानगी देण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. तसेच याचा पाठपुरावा शाळेचे वरीष्ठ शिक्षक ए. वाय. पाटील यांनी केले. याकामी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment