उध्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निष्ठावंत शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंघीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक जिल्ह्यातील ग्रामीण शिवसैनिकांच्या वतीने हा मेळावा आयोजित केल्याची माहीती जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे यांनी दिली.
रविवारी (ता. १४) सकाळी ११ वाजता पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे बेळगाव-वेगुर्ला रोडवरील अडकूरकर हॉल येथे हा मेळावा होईल. संपर्कप्रमुख व उपनेते अरुणभाई दूधवडकर यांच्या उपस्थितीत पाटणे फाटा चंदगड येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उबाठा शिवसेनेच्य वतीने करण्यात आले आहे.
.jpeg)
No comments:
Post a Comment