खन्नेटी शाळेची नव्या मोरे १०० मीटर धावणे मध्ये तालुक्यात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

13 December 2025

खन्नेटी शाळेची नव्या मोरे १०० मीटर धावणे मध्ये तालुक्यात प्रथम

  

खन्नेटी : नव्या मोरे हिचा सत्कार करताना अनुसया नागाज, पूजा नांगनुरकर, सावित्री नाईक, रेशमा केसरकर, वर्षा मोरे, किशोर पाटील, मारुती हुद्दार आदी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

        ११ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या अध्यक्ष चषक तालुकास्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत खन्नेटी (ता. चंदगड) शाळेची विद्यार्थिनी कुमारी नव्या संदीप मोरे हिने १०० मीटर धावणे प्रकारात लहान वयोगटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली.  शाळा व्यवस्थापन समिती खन्नेटी तर्फे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनुसया नागाज यांच्या शुभहस्ते शाल, पुष्पहार व फेटा घालून नव्या हिचा सत्कार करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी अंगणवाडी सेविका पूजा  नागनूरकर, आशा वर्कर सावित्री नाईक, शालेय पोषण आहार ठेकेदार रेश्मा केसरकर, माता पालक संघाच्या वर्षा मोरे व आणि इतर पालक उपस्थित होते.

     यावेळी तालुकास्तरावर लहान गटातील मुलींनी कबड्डी स्पर्धेत सेमी फायनल पर्यंत मजल मारून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून अविस्मरणीय खेळ खेळल्याबद्दल सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

     यावर्षी तालुकास्तरावर खेळल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धेसाठी खन्नेटी येथील यल्लाप्पा अण्णा नागाज यांनी पंधराशे रुपयेची देणगी दिल्याबद्दल तसेच कुदनुर गावच्या सरपंच संगीता घाटगे यांनी खेळाडूंना स्पोर्ट्स किट्स दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक किशोर पाटील व मारुती हुद्दार उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment