
सुप्रसिध्द उद्योगपती, शास्त्रज्ञ व डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ अमेरिकेचे खासदार डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना खेडूत शिक्षण मंडळाचे माजी सचिव प्रा. आर. पी. पाटील
चंदगड / सी एल वृत्तसेवा
सुप्रसिध्द उद्योगपती, शास्त्रज्ञ व डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ अमेरिकेचे खासदार डॉ. श्रीनिवास ठाणेदार बेळगाव येथील चिंतामणराव पटवर्धन शाळेच्या शताब्दी महोत्सवासाठी आले होते. यावेळी अमेरिकेचे खासदार डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांचा सत्कार खेडूत शिक्षण मंडळाचे माजी सचिव प्रा. आर. पी. पाटील यांनी करून त्यांना संस्थेला भेट देण्याचे पत्र दिले. त्यांचेसोबत एस. एम. भोगण उपस्थित होते.
सुप्रसिध्द उद्योगपती, शास्त्रज्ञ व डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ अमेरिकेचे खासदार डॉ. श्रीनिवास ठाणेदार बेळगावच्या चिंतामणराव पटवर्धन सरकारी शाळेच्या शताब्दी महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते या शाळेचे माजी विद्यार्थी. त्यांचे मूळ गाव चंदगड तालुक्यातील कल्याणपूर व शहापूर-बेळगावचे सुपुत्र अशी त्यांची ओळख. प्रतिकुल परिस्थितीत जिद्दीने त्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. उच्चविद्याविभूषित, उच्चपदस्थ व उद्योगपती असूनही ते सामान्य माणसाशी विनयतेने बोलतात, वागतात. अर्जेटिना, मिशिगन चे महापौर होण्याचा त्यांचा मानस ते दोनवेळा डेमॉक्रॅटिक पार्टीतून अमेरिकेचे खासदार झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषविलेल्या बराक ओबामा व बिल क्लिंटन यांचेशी त्यांचे जवळीकतेचे संबंध आहेत.
No comments:
Post a Comment