कालकुंद्री ग्रामपंचायत च्या वतीने महिलांसाठी मेहंदी, रांगोळी, ब्लाउज व साडी मेकिंग प्रशिक्षण ४ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2025

कालकुंद्री ग्रामपंचायत च्या वतीने महिलांसाठी मेहंदी, रांगोळी, ब्लाउज व साडी मेकिंग प्रशिक्षण ४ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन

  


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    ग्रामपंचायत कालकुंद्री व ग्लोबल मराठा रणरागिनी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास अंतर्गत महिला व मुलींसाठी व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. कालकुंद्री, ता. चंदगड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच छाया जोशी यांच्या अध्यक्षतेखाली श्री कलमेश्वर विकास सेवा संस्था सभागृहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी जि. प. सदस्या सुजाता मारुती पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. 

   १० दिवस चालणाऱ्या या शिबिरात गावातील महिला व मुलींसाठी मेहंदी प्रशिक्षण, ब्लाउज व नऊवारी साडी मेकिंग, रांगोळी प्रशिक्षण तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मेहंदी प्रशिक्षण अंतर्गत सर्व प्रकारच्या मेहंदी काढण्याचे प्रशिक्षण सौ राजश्री निकम देणार आहेत. ब्लाउज मेकिंग प्रशिक्षणात विविध डिझाईनचे ब्लाऊज शिवण्याचे  तर नऊवारी साडी मेकिंग प्रशिक्षण अंतर्गत नऊवारी साडी शिवण्याचे प्रशिक्षण सौ संगीता लोखंडे देणार आहेत.

  शिबिरात  ४ जानेवारी २०२६ रोजी देसाई हॉस्पिटल कार्डिॲक केअर सेंटर गडहिंग्लज यांच्यावतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर केली जाणार आहे. तर शिबिराची सांगता पाच व सहा जानेवारी रोजी दुपारी ११ ते ३ वाजता संस्कार भारती रांगोळी प्रशिक्षणाने होणार आहे. संस्कार भारती रांगोळी चे मार्गदर्शन सौ राजश्री निकम ह्या करणार आहेत. याचा लाभ महिला व मुलींनी घ्यावा अशी आवाहन ग्रामपंचायत कालकुंद्री यांनी केले आहे.

     दहा दिवस चालणाऱ्या या विविध प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपसरपंच संभाजी पाटील ग्रामपंचायत अधिकारी ओमकार दिवेकर ग्लोबल मराठा रणरागिनी ऑर्गनायझेशन सीईओ जयकुमार देसाई, अध्यक्ष धन्वंतरी देसाई आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment