तेऊरवाडीचे जेष्ठ धावपट्टू रामराव गुडाजी यांची सुवर्ण कामगिरी, सुरत येथील अखिल भारतीय धावण्याच्या स्पर्धेत २ सुवर्ण व ३ रौप्य पदकांची कमाई - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2025

तेऊरवाडीचे जेष्ठ धावपट्टू रामराव गुडाजी यांची सुवर्ण कामगिरी, सुरत येथील अखिल भारतीय धावण्याच्या स्पर्धेत २ सुवर्ण व ३ रौप्य पदकांची कमाई

 

रामराव गुंडू गुडाजी

तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा  दि. ३०-१२-२०२५

     यशस्वी होण्यासाठी वयाचे कोणतेच बंधन नसते. वय ही केवळ आकडेमोड आहे. अभी तो मै जवान हू म्हणत आजच्या पिढीतील सर्वच तरूणांना लाजवत ७१ वर्षाच्या रामराव गुंडू गुडाजी या जेष्ठ नागरिकांने य अखिल भारतीय प्रौढ धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली.

       सुरत (गुजरात) येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत ७१ ते ७५ या वयोगटात रामराव गुडाजी यानी २ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानी  ४ x १०० मीटर रिले व ४ x ४०० मीटर रिले या दोन शर्यतींमध्ये दमदार कामगिरी करत सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले. सांघीक स्पर्धे बरोबच वैयक्तिक धावण्याच्या शर्यतींमध्येही त्यांनी आपली सातत्यपूर्ण गुणवत्ता सिद्ध करत ४०० मीटर, ८०० मीटर आणि १५०० मीटर या शर्यतींमध्ये तीन रौप्य पदके पटकावली.

        यापूर्वी  २०२२ ते २०२५ या कालावधीत कोलकत्ता, बेंगलोर, धारवाड व सुरत येथे झालेल्या विविध अखिल भारतीय स्पर्धांमध्ये गुडाजी यांनी आतापर्यंत ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ५ कांस्य अशी एकूण १५ पदके जिंकून ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

        या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार व स्थानिक नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. वयाच्या या टप्प्यावरही त्यांची जिद्द, शिस्त व मेहनत अनेक तरुण खेळाडूंनाही प्रेरणा देणारी ठरत आहे.

        “हे यश केवळ माझे नसून माझ्या कुटुंबाचे, प्रशिक्षकांचे आणि गावाचे आहे. पुढील स्पर्धांसाठी मी अधिक जोमाने तयारी करणार आहे,” अशी प्रतिक्रिया गुडाजी यांनी व्यक्त केली. त्यांच्या या कामगिरीमुळे वृद्धांसाठी क्रीडा क्षेत्रात नवे दालन खुले झाले आहे. श्री. गुडाजी गावातील मूला मुलींना मर्दानी खेळाचे, लेझिमचे धडे देतात. अमेरिकेतही त्यांनी कॉलेज विघार्थ्यांना धावण्याचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment