![]() |
| डॉ. वृषाली पाटील (MBBS) |
कोवाड (ता. चंदगड) येथे दुंडगे रोडवर गत ४३ वर्षापासून सुरू असणाऱ्या डॉ. पी. एस. पाटील यांच्या हॉस्पिटलचा आज रविवार दि. २८ रोजी स्थलांतर व नव्या प्रशस्त हॉस्पिटलचा उद्घाटन कार्यक्रम कोवाड येथे किणी क्रॉस जवळ होत आहे. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, दौलत साखर कारखान्याची माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांच्या उपस्थितीत अश्विनी नर्सिंग होम व मॅटरनिटी हॉस्पिटलचा स्थलांतर व उद्घाटन समारंभ रविवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता होत आहे. सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हॉस्पिटलचे संचालक डॉ. पी. एस. पाटील, डॉ. अमोल पी. पाटील, संचालिका डॉ. वृषाली ए. पाटील यांनी केले.
![]() |
| कोवाड : किणी क्रॉस जवळील, हॉस्पिटलची प्रशस्त इमारत. |
डॉ. पी. एस. पाटील यांनी १९८२ साली एमबीबीएस पूर्ण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली गत ४३ वर्षापासून हे हॉस्पिटल दुंडगे रोड, कोवाड येथे कार्यरत होते. आता या सेवेमध्ये त्यांची दुसरी पिढी कार्यरत आहे. त्यांचे सुपुत्र डॉ. अमोल पाटील व त्यांच्या पत्नी डॉ. वृषाली पाटील यांनी आता या हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा देण्याचा संकल्प केला आहे. किणी कर्यात भागात १९८२ पासून विश्वासारहता ठेवून अविरत रुग्णसेवा सुरू आहे.
१९८२ साली एमबीबीएस ही पदवी घेऊन डॉ. पी. एस. पाटील यांनी आपल्या सेवेला प्रारंभ केला. आता त्यांचा वारसा पुढे चालवत त्यांचे सुपुत्र डॉ. अमोल पाटील यांनीही बेळगाव येथून एमबीबीएस ही पदवी घेतली. त्यांनी सोलापूर येथे येथील अश्विनी रुग्णालयात भूलतज्ञ, बेळगाव येथील बीम्स मध्ये सर्जरी मेडिसिन विभागात जुनियर रेसिडेंट डॉक्टर म्हणून उत्तुर (ता. आजरा) आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर तसेच कोल्हापूर येथे सीपीआर हॉस्पिटल मध्ये भूलतज्ञ म्हणून काम केले आहे. यानंतर ते गत नऊ वर्षापासून कोवाड येथे स्वतःच्या दवाखान्यात सेवा देत आहेत. डॉ. अमोल पाटील यांच्या पत्नी डॉ. वृषाली पाटील यांनी कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यानंतर उमा चारिटेबल ट्रस्ट (जत, सांगली) येथून डिजीओ पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबई येथील नौरोजीया वाडिया मध्ये सोनोग्राफीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कोवाड (ता. चंदगड) आरोग्य केंद्रामध्ये तसेच कराड येथील किम्स या मेडिकल कॉलेजमध्येही सेवा दिली. या अनुभवाच्या जोरावर कोवाड येथील आता नव्या हॉस्पिटलमध्ये डॉ. अमोल पाटील व डॉ. वृषाली पाटील तितक्याच कौशल्याने व आपुलकीने सेवा देत आहेत. डॉ. वृषाली यांनी (एमबीबीएस, डीजीओ) प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इस्लामपूर, सांगली येथे घेतले. यानंतर डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूर येथे एमबीबीएस ही पदवी घेतली. जत सांगली येथील डॉ. रवींद्र अरळी यांच्या उमा चॅरिटेबल ट्रस्ट येथून डीजीओ ही पदवी घेतली. यानंतर त्यांनी कोवाड (ता. चंदगड) येथील कोवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले आहे. तसेच कराड येथील किम्स मेडिकल कॉलेज येथे ज्युनिअर रेसिडेंट डॉक्टर म्हणून मी काम केले आहे.
डॉ. अमोल पाटील यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर किणी येथे झाले असून गावातीलच जयप्रकाश विद्यालयात हायस्कूल शिक्षण घेतले. यानंतर गडहिंग्लज येथील साधना महाविद्यालयात जुनिअर महाविद्यालयीन शिक्षण घेतले. यानंतर बेळगाव येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज (जेएनएमसी) मधून एमबीबीएस ही पदवी घेतली. त्यानंतर सोलापूर येथील अश्विनी रुग्णांलयात भूलतज्ञ म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. तसेच बेळगाव येथील बीम्स येथे सर्जरी मेडिसिन विभागात जुनियर रेसिडेंट डॉक्टर तसेच उत्तूर (ता. आजरा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मेडिकल ऑफिसर म्हणून तर कोल्हापूर येथील सीपीआर या हॉस्पिटलमध्ये भुलतज्ञ विभागात ज्युनिअर रेसिडेंट डॉक्टर म्हणून काम केले आहे. या अनुभवाच्या जोरावरच २० मार्च २०१६ पासून कोवाड येथे त्यांची सेवा सुरू आहे.
डॉ. पी. एस. पाटील यांच्या प्रामाणिक आणि विश्वासार्ह सेवेमुळे या हॉस्पिटलचा मोठा नावलौकिक आहे. डॉ. पी. एस. पाटील हे चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनवर सल्लागार संचालकपदी कार्यरत आहेत. सुरुवातीला कोवाड येथे सुतार यांच्या घरचा दवाखाना ते आता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हा प्रवास म्हणजे एका सामान्य कुटुंबातील वैद्यकीय सेवेत मोठे योगदानच मानावे लागेल.


.jpeg)

No comments:
Post a Comment