कागणी हायस्कूलचे निवृत्त शिक्षक मारुती लाळगे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2025

कागणी हायस्कूलचे निवृत्त शिक्षक मारुती लाळगे यांचे निधन

  

मारुती अण्णाप्पा लाळगे

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

        कागणी (ता. चंदगड) येथील श्री. व्ही. के. चव्हाण - पाटील हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे निवृत्त शिक्षक मारुती अण्णाप्पा लाळगे (वय ६८, मुळगाव उचगाव व सध्या रा. विजयनगर, हिंडलगा, बेळगाव) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि. २७) निधन झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

    कारवे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालयाच्या निवृत्त वरिष्ठ क्लर्क वंदना लाळगे यांचे ते पती होय. इंग्रजी शिक्षक संघटना तालुका प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. तसेच अनेक प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट पीटी ट्रेनिंग देण्यासाठी त्यांचा विशेष हातखंडा होता. चंदगड येथील निवृत्त मुख्याध्यापक शिनोळकर यांचे ते जावई तर हिंडलगा येथील रहिवाशी व पुणे येथील अभियंता संदीप शिंदे यांचे ते सासरे होय.

No comments:

Post a Comment