कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यंदा स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त संस्थेने सभासद, हितचिंतक यांच्या सहकार्यातून संस्थेच्या गेल्या पन्नास वर्षातील वाटचालीचा आढावा घेणारी 'सुवर्ण लक्ष्मी' स्मरणिका संपादित केली आहे. आकर्षक स्मरणिकेचे प्रकाशन गुरुवारी दि. २५ रोजी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील होते.
चेअरमन यशवंत बामणे व व्हाईस चेअरमन दिलीप पवार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक करताना सिद्राम गुंडकल यांनी संस्थेच्या पन्नास वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संचालक चंद्रकांत निर्मळकर, मौला जमादार, डॉ संदेश जाधव, आदींनी मनोगते व्यक्त केली. आमदार शिवाजीराव पाटील व भरमूआण्णा पाटील यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बी. एस. मुतकेकर, बी. जी. जाधव, माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, अनिल शिवनगेकर, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन भावकू गुरव, दिग्विजय देसाई, बाबाजान कालकुंद्रीकर, मारुती आंबेवाडकर, रामचंद्र मल्हारी, राजू रेडेकर आदी मान्यवरांसह संस्थेचे आजी-माजी संचालक पदाधिकारी कर्मचारी सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवस्थापक बाळकृष्ण नागरदळेकर यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment