चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
दि महाराष्ट्र एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अकॅडमी संचलित, तुर्केवाडी येथील महादेवराव बीएड कॉलेजच्या वतीने शालेय आंतरवासिता कार्यक्रम बसर्गे येथील भावेश्वरी विद्यालयात सुरू आहे. या शिबिरातील प्रशिक्षणार्थी व हायस्कूलच्या वतीने विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपतींच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी बोलताना प्रमुख वक्ते एम. एन. शिवनगेकर यांनी शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊ नका तर डोक्यात घ्या, त्यांच्या विचारांनी प्रेरित व्हा व पुढील आयुष्य जगा. असा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष मुख्याध्यापक जे. जे. कोकितकर होते. एस. जे. पाटील, वाय. पी. पाटील, पी जी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यालयातील मुला मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन क्रमांक पटकावले.

No comments:
Post a Comment