बागिलगे येथे शिवजयंती उत्साहात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2026

बागिलगे येथे शिवजयंती उत्साहात साजरी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        बागिलगे (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजंती निमित्त स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंदगड तालुक्यातील नूतन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी राज्यकर अधिकारी गोपाळ पाटील होते.

    विविध कलागुण दर्शन कार्यक्रमात अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागिलगे च्या बालकलाकारांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, देशभक्तीपर गीते, शिवचरित्र, पोवाडे, गड आला पण सिंह गेला व ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशा नाटीकेतून रसिक श्रोत्यांचे प्रबोधन करुन मंत्रमुग्ध केले. यावेळी चंदगड पंचायत समितीचे नुतन सदस्य व सभापती विलास नाईक, सदस्य मधुकर आंबेवाडकर, प्रेमा हुलजी, पांडुरंग बेनके, मनस्वी कांबळे, जि. प. सदस्या कुमारी मानसीताई भोगण, विद्या पाटील, रचना गावडे, कोवाडच्या सरपंच अनिताताई भोगण, सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील, हलकर्णी चे सरपंच राहुल गावडे, रामपूर सरपंच झिलू यादव, बागिलगे सरपंच नरसू पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुखदेव शहापूरकर, सुरज पाटील, पालक ग्रामस्थ यांचे उपस्थित संपन्न झाला.

    यावेळी नुतन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देवून करणेत आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागिलगे शाळेतील तालुका व जिल्हा स्पर्धेतील यशवंत विद्यार्थी रणवीर पाटील, संस्कार पाटील, आसावरी पाटील यांचा सत्कार रोख रक्कम व शाल देवून जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचे हस्ते करणेत आला. तसेच उत्कृष्ठ कार्याबद्दल अध्यापक बाबुराव वरपे यांचा विशेष सत्कार शिवप्रेमी ग्रूपचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील व शिवप्रेमी युवक बागिलगे तसेच शालेय कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांचे हस्ते करणेत आला. 

    शाळेच्या वाटचालीबद्दल मुख्याध्यापक परशराम यरोळकर, मार्गदर्शक संजय पाटील, जयश्री पाटील, स्वराली पाटील, प्रियांका शिवणगेकर, राजश्री पाटील यांचाही विशेष सत्कार करणेत आला. प्रास्ताविक बाबुराव वरपे यांनी केले. दिपप्रज्वलन व शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करणेत आले. आभार राज्यकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी मानले. सुत्रसंचालन संजय पाटील व प्रियांका शिवणगेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment