![]() |
| केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रसंचालक एन आर भाटे |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
दहावीची बोर्ड परिक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी पासून सुरू होत असून या परिक्षेची संपूर्ण तयारी झाली आहे. अडकूर (ता. चंदगड) केंद्रावर मराठी व इंग्रजी माध्यमाचे मिळून १९३ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती केंद्रसंचालक एन. आर. भाटे यानी दिली.
अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज (केंद्र क्र ४६०७) मध्ये १० वी बोर्ड परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर अडकूर, आमरोळी, सातवणे, अलबादेवी, गवसे व कुरणी बुझवडे येथील हायस्कूल मधील विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. यामध्ये १६४ मराठी माध्यम व २९ इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. एस.एस.सी बोर्डाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. तसेच या केंद्रावरील सर्वच वर्गखोल्यामध्ये अतीउच्च दर्जाचे CCTV कॅमेरे लावण्यात आले असून त्याचे नियंत्रण कक्ष केंद्रसंचालकांच्या दालनात ठेवण्यात आहे. या केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले असून गैरकृत्य करणाऱ्यावर थेट कारवाई करण्याचे संकेत केंद्रसंचालक एन. आर. भाटे यानी दिले आहेत. यावेळी सातवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक टी. एल. तेरणीकर, अलबादेवी हायस्कूलचे विजय कोले, कारमेल इंग्लीश मेडिअम स्कूलच्या सिल्व्हीया मोसंग, आमरोळी हायस्कूलचे एस. एन. पाटील, बुझवडे हायस्कूलचे एस. के. पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment