बीसीए, बीबीए प्रवेशासाठी शासनाची यऺदाही सीईटी आवश्यक, अर्ज नोदणी १६ फेब्रुवारी पर्यंत - प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2026

बीसीए, बीबीए प्रवेशासाठी शासनाची यऺदाही सीईटी आवश्यक, अर्ज नोदणी १६ फेब्रुवारी पर्यंत - प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल

 


संपत पाटील - चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      ए आय सी टी ई च्या निर्देशनानुसार नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बीसीए, बीबीए, बीएमएस,  बीबीएम  या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची राज्य सीईटी प्रवेश प्रवेश परीक्षा सक्तीची करण्यात आल्याची माहिती र. भा.माडखोलकर महाविद्यालय चंदगडचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी दिली.

    बारावी नंतर बीसीए, बीबीए, बीएमएस व बीबीएम  या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करता राज्य सामायिक प्रवेश कक्षा मार्फत प्रवेशासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून बहुपर्यायी 100.गुणांची इंग्रजी भाषा, रीजनिंग, जनरल नॉलेज अवेअरनेस आणि कम्प्युटर बेसिक या अभ्यासक्रमावर असणार आहे. सीईटी परीक्षेसाठी बारावीची परीक्षा देणा-या, दिलेल्या किंवा बारावी पास झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज नोंदणी www.cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करायचे आहे. 

    सदर ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे शुल्क खुल्या वर्गासाठी ₹ १३०० रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी १०००/११०० रुपये शुल्क असून ऑनलाईन  फॉर्म भरताना ऑनलाईन इंटरनेट पेमेंट, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे भरावे लागणार आहे. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय मध्ये संबधीत विद्यार्थीना याबाबतचे मोफत मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयामध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत प्रा. आर. व्ही. आजरेकर, प्रा. पी. ए. गवस, प्रा. आर. एस. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment