चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचा बुलंद आवाज, सर्वसामान्यांचे नेते अजित दादा पवार यांचे अपघाती दुःखद निधन झाले. त्यांच्या निधानाने महाराष्ट्राचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे. चंदगड नगरपंचायतीच्या विकासासाठी दादांनी दहा कोटीचा निधी दिला आहे. कै. दादांच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी चंदगड नगरपंचायत नूतन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहाला कै. अजितदादा पवार सभागृह असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरपंचायतीचे गटनेते नवीन अत्तार यांच्यासह अन्य नगरसेवकांनी चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनावर गटनेते नवीन अत्तार, संजय चंदगडकर, सिकंदर नाईक, सुधीर पिळणकर, प्रमोद कांबळे, सौ. सुधा गुरबे, सौ. जयश्री वणकुंद्रे, सौ. सानिया आगा व सुभाष गावडे यांच्या सह्या आहेत.

No comments:
Post a Comment