तावरेवाडी येथे २४ ते २६ फेब्रुवारीला मंगाईदेवी मंदिराचा वर्धापन, विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2026

तावरेवाडी येथे २४ ते २६ फेब्रुवारीला मंगाईदेवी मंदिराचा वर्धापन, विविध कार्यक्रमांचे आयोजन

  


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      तावरेवाडी (ता. चंदगड) येथील जागृत देवस्थान श्री मंगाईदेवी मंदिराचा ११ वर्धापन दिन मंगळवार दि. २४ फेब्रुवारी ते शुक्रवार २६ फेब्रुवारी अखेर ह.भ. प. डॉ.विश्वनाथ पाटील यांच्या  अधिपत्याखाली व पुरोहित राजेश कुलकर्णी यांच्या मंत्रघोषत  संपन्न होणार आहे.

        या कार्यक्रमा निमीत्त भजन,कीर्तन,दिंडी व  महाप्रसाद आसे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.   यामध्ये मंगळवारी  सकाळी शेवंता व लक्ष्मण भरमु आवडण यांच्या हस्ते मुहूर्त मेढ करण्यात येणार आहे.

  तर संध्याकाळी हभप नंदकुमार गावडे (तुर्केवाडी) यांचे प्रवचन व रात्री फलटण येथील अमोल महाराज सूळ यांचे कीर्तन होणार आहे. बुधवारी सकाळी उपासना व शिवाजी रामचंद्र पाटील यांच्या हस्ते मूर्ती अभिषेक व धार्मिक विधी संपन्न होणार आहे. संध्याकाळी  हभप डॉ. विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन व आथनी येथील तुकाराम महाराज हजारे यांचे कीर्तन  होणारं आहे.

     गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी  सकाळी मुर्ती अभिषेक व धर्मीक विधी, दिंडी,गंगा पुजन  व यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री सांगोला येथील संदीप मोहिते व अतुल हातेकर यांच्या भारुडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

      तरी भविकांनी या कार्यक्रमाला  उपस्थित राहुन श्रवण सुखाचा व  महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर कमिटी व ग्रामस्थांच्या  वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment