जिल्हास्तरीय खोखो स्पर्धेत अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलच्या मूलींची बाजी - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2026

जिल्हास्तरीय खोखो स्पर्धेत अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलच्या मूलींची बाजी

  

तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

    कुरुंदवाड येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या खो-खो खेळात श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अडकुर (ता. चंदगड) येथील मुलींच्या संघाने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. चंदगड तालुक्यातील मुलीनी जिल्हा स्तरावर मिळवलेल्या या उज्वल यशाने या मूलींचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

     तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर या संघाची जिल्हा स्तरावर निवड झाली होती. या वेळी जिल्ह्यातील मातब्बर संघाशी झुंज देत चंदगड तालुक्यातील अडकूर हायस्कूल च्या या मुलीनी द्वितिय क्रमांक प्राप्त केला. या खेळाळूमधे  वैशाली, सानवी, साक्षी, नयन, श्रावणी, समिधा, अनिता, श्रद्धा, सोनाली, तेजल, वैष्णवी, शिवानी, समिधा गावडा, श्रीनाक्षी या मुलींचा सहभागी होत्या. याबरोबरच तालूका स्तरीय तायकांदो स्पर्धेत समिधा कदन हिने प्रथम क्रमांक मिळवला. आरोही सागर कादम हिने सुद्धा तायकांददो मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना प्राचार्य एन. आर. भाटे व क्रीडा शिक्षक  आय. वाय. गावडे, प्राध्यापक शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment