मुलांनी जाणून घेतल्या वंचितांच्या वेदना! दि न्यू इंग्लिश स्कूलचा संवेदनशील उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2026

मुलांनी जाणून घेतल्या वंचितांच्या वेदना! दि न्यू इंग्लिश स्कूलचा संवेदनशील उपक्रम


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        समाजातील वंचित घटकांचे जीवन आणि संघर्ष समजून घेण्यासाठी दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील संभाजीनगर परिसरातील धावड समाजाच्या तांड्याला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पारंपरिक व्यवसायाची, राहणीमानाची आणि दैनंदिन समस्यांची माहिती घेतली.

    खुरपे, कोयते, कोरणे आदी शेतीची अवजारे तयार करणे व त्यांना धार लावणे हा या समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. एका टेम्पोत संसार थाटून उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या या कुटुंबांचे वास्तव विद्यार्थ्यांनी जवळून अनुभवले. विद्यार्थ्यांनी कुटुंबीयांच्या मुलाखती घेतल्या तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप केले.

    प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात उपप्राचार्य टी. एस. चांदेकर, पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर व शिक्षक एस. जी. साबळे यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक संवेदनशीलता, सहानुभूती आणि माणुसकीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. हा संदेश देणारा हा उपक्रम वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीत विधायक बदल घडवून आणत असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

No comments:

Post a Comment