अडकूर / एस के पाटील / सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुका दुष्काळाचा सामना करत असतानाच हंत्तीच्या आगमनाने थोडेफार शिल्लख राहिलेल्या पिकांची या हत्तीकडू प्रचंड नासधून करण्यात आल्याने मोरेवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी चिताग्रस्थ झाले आहेत. आजरा तालुक्यातून चंदगड तालुक्यात दाखल झालेल्या या हत्तींचा दणका, वरून दुष्काळाचा तडाका यामुळे मोरेवाडी ग्रामस्थ हतबल झाले असून या शेतीचे वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अडकूर पासून जवळच डोंगर उतारावर मोरेवाडी गाव वसले आहे. कोरडवाहू असणाऱ्या व तीव्र डोंगर उतारावर असणाऱ्या या गावातील शेतकरी भात, नाचना अशी मुख्य पिके घेतात. पण चालू वर्षी पावसाने ओढ दिल्याने अगोदरच पिकांची वाढ खुंटली आहे. निदान जनावारांचा चारा तरी मिळेल अशी आशा बाळगून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी हत्तींच्या आगमनाने निघून गेले. अपार कष्ट करून, जिवापाड जपलेली शेती दोन दिवसांपूर्वी आजरा तालुक्याच्या डोंगरातून आलेल्या दोन हत्तीनी उध्वस्थ करून टाकली या हत्तीनी भात नाचणा पिकांची प्रचंड नासधूस केली आहे. यामध्ये सुधाकर बयाप्पा तिबिले, शामराव धोंडिबा तिबिले , शशिकांत रामू तिबिले, यशवंत लक्ष्मण घेवडे, एकनाथ बयाप्पा तिबिले या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने याची गांभिर्याने दखल घेऊन आम्हाला शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. नाहीतर आमचे शेत ताब्यात घेऊन या ठिकाणी हत्ती गवी पाळावेत. त्या बदल्यात आम्हाला शेतीचाखंड द्यावा अशी शेतकऱ्यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment