चंदगडी ट्रेकर्स आयोजित तालुकास्तरीय किल्ले स्पर्धेचा बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2026

चंदगडी ट्रेकर्स आयोजित तालुकास्तरीय किल्ले स्पर्धेचा बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

 


तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

    दिवाळीत 'चंदगडी ट्रेकर्स'कडून तालुकास्तरीय भव्य किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ कलानंदी या ऐतिहासिक किल्यावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला .या स्पर्धेमध्ये कोवाडच्या शिवशंभू गृपचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .

    या स्पधेमध्ये  तालुक्यातून जवळ जवळ 140-150 किल्ले स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला होता.दिनांक 15 नोव्हेंबर रोजी यातून निवडलेल्या किल्यांचे प्रत्यक्ष परीक्षण करून नंबर काढण्यात आले होते. आज कलानंदी गडावर याचं बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी मान्यवर, ग्रुपचे सदस्य तसेच किल्ले विरांनी गर्दी केली होती. मोबाईलच्या नादात गुंग झालेल्या पिढीला( बाल/तरुण) इतिहासाची आठवण करून देण्याच्या आणि महाराज्यांच्या गडकोटात काही क्षण हरवून जाण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे ग्रुपचे अध्यक्ष अजित पाटील यांनी सांगितले. किल्ले परीक्षण करताना  किल्ले बनवलेल्या मावळ्यांचा उत्साह बघताना आयोजित केलेल्या स्पर्धेच सार्थक झाल्याचं समाधान झालं असं  अजित पाटील आणि ग्रुपच्या सर्वच सदस्यानी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले . 

        गेली 6 वर्षे ही स्पर्धा विनामूल्य आयोजित करण्यात येत असून यापुढेही अशीच सुरु राहील आणि आपल्या मावळ्यांना इतिहासात हरवून जाण्याची संधी दिली जाईल अशी ग्वाही चंदगडी ट्रॅकर्स कडून देण्यात आली. या स्पर्धेत ऐकून 7 क्रमांक काढण्यात आले. बाल मावळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 3 बाल स्थापत्य पुरस्कार आणि 1विशेष अवलिया पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.श्री.शिवशंभु ग्रुप कोवाड प्रथम क्रमांक,श्री शिवशंभू ग्रुप केरवडे द्वितीय,S. G. M boys हेरे तृतीय, S. T. M boys सत्तेवाडी चतुर्थ, श्री.शिवशंभु प्रतिष्ठान अडकूर पाचवा, शिवप्रेमी ग्रुप  सुतार गल्ली हलकर्णी सहावा, स्वराज्य प्रतिष्ठान मंडळ गवसे सातवा क्रमांक तसेच अनिकेत आणि स्वरा सचिन निकम,जागृत प्रकाश सुतार, धर्मरक्षक ग्रुप हलकर्णी या तिघांना बाल स्थापत्यकार हे पुरस्कार तर माऊली मित्र मंडळ कोदाळी यांना विशेष अवलिया पुरस्कार  असे एकूण 11 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यापुढेही दरवर्षी अश्याच मोठ्या संख्येने मावळ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन या ग्रुपकडून करण्यात आलं.

No comments:

Post a Comment