तेऊरवाडीत रंगणार अखंड हरिनामाचा सप्ताह सोहळा , प्रसिद्ध किर्तनकारांची किर्तन व प्रवर्चनाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2026

तेऊरवाडीत रंगणार अखंड हरिनामाचा सप्ताह सोहळा , प्रसिद्ध किर्तनकारांची किर्तन व प्रवर्चनाचे आयोजन

तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

समस्त वारकरी संप्रदाय , हरिनाम सप्ताह कमिटी व ग्रामस्थ मंडळ तेऊरवाडी ( ता .चंदगड ) यांच्या संयुक्त विद्यमाने तेऊरवाडी येथे श्री ज्ञानेश्वर माऊली संजिवनी समाधी सोहळ्यानिमित्य अखंड हरिनाम सप्ताह व कार्तिक उत्सव कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि 3 ते शनिवार दि 5 डिसेंबर पर्यंत  करण्यात आले आहे .

या निमित्य प्रसिद्ध असलेले भागवताचार्य प्रशांतजी महाराज खानापूरकर (लातूर ) यांचे गुरुवार दि 3 डिसेंबर रोजी किर्तन व डॉ विश्वनाथ पाटील ( जट्टेवाडी ) यांचे प्रवचन ,सौ सुप्रिया ताई साठे ( राजगुरूनगर पुणे ) यांचे शुक्रवार दि 4 डिसेंबर रोजी किर्तन तर संतोष महाराज खुटवड (बारामती ) यांच्या प्रवर्चना चा  कार्यक्रम होणार आहे . सकाळी 4 ते 6 काकड आरती , सकाळी 11 ते 4 महिला भजन , सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ , रात्री  9 ते 11  किर्तन व पुढे रात्रभर हरिजागर भजन होणार आहे . यामध्ये हडलगे , कोवाड , निट्टूर , मलतवाडी , तेऊरवाडी घुल्लेवाडी , राजगोळी , कुदनूर , दुंडगे , कागणी , कालकुंद्री , किणी , नागरदळे ,माणगाव , लकिकट्टे , तळगुळी , काळेवाडी , मरणहोळ , सांबरे , कुमरी , दड्डी , शट्टीहळी , सलामवाडी , म्हाळेवाडी आदि गावातील भजनी मंडळांच्या भजनाची भजन सेवा होणार आहे . रोज पहाटे काकडा , ज्ञानेश्वरी पारायण , हरिपाठ प्रवचन , किर्तन ,भजन नामस्मरण  अशा माध्यमातून आध्यात्मिक विचारांची देवाणघेवाण व्हावी समाजामध्ये भक्तिभाव , एकोवा व सामाजिक सलोखा वृद्धिंगत व्हावा याच उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .

शनिवार दि 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे . सायंकाळी 5 ते 8 पालखी दिंडी सोहळा व रात्री 9 वाजता मराठी विद्यामंदिर व तेऊरवाडी माध्यमिक विद्यालय 

तेऊरवाडी यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे . तरी या कार्यक्रमाचा लाभ चंदगड , आजरा गडहिंग्लजसह शेजरच्या कर्नाटक राज्यातील भाविकांनी घ्यावा अवाहन तेऊरवाडी हरिनाम सप्ताह कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे .

No comments:

Post a Comment