माडखोलकर महाविद्यालयात ३० नोव्हेंबरला खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2026

माडखोलकर महाविद्यालयात ३० नोव्हेंबरला खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        खेडूत शिक्षण मंडळाचे र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड यांच्या वतीने संस्थेचे माजी चेअरमन स्व. र. भा. माडखोलकर यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य जयंती कार्यक्रम दि. १ डिसेंबर २०२६ रोजी होणार असून, त्याच्या पूर्वसंध्येला या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

    ही स्पर्धा महाविद्यालयाच्या 'किरण ठाकूर सेमिनार हॉल'मध्ये सकाळी १०.०० वाजता सुरू होईल. प्रत्येक स्पर्धकाला आपले विचार मांडण्यासाठी कमाल ७ मिनिटांचा वेळ दिला जाईल. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना अनुक्रमे ५,००० रुपये, ४,००० रुपये, ३,००० रुपये आणि २,००० रुपये अशी रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणे आहेत:

१. महात्मा फुले यांची शिक्षण विषयक विचारधारा व आजची शिक्षण व्यवस्था

२. चंदगड तालुक्यातील शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत स्व. र. भा. माडखोलकर सर

३. जेन झी (Gen-Z) च्या अंतरंगात दडलंय तरी काय?

४. सोशल मीडिया संवादाचे माध्यम की विसंवादाचे कारण?

५. दुष्काळ निसर्गाचा कोप की मानवाची चूक?

        तरी सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या वक्तृत्व कलेचे सादरीकरण करावे, असे आवाहन र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी www.rbmcollege.ac.in या संकेतस्थळावर किंवा rbmcollegechand@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment