चंदगड / सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील नागरदळे येथे अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप कटरने तोडून घरात प्रवेश करत सुमारे १ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.१५ या वेळेत घडली.
याबाबत सौ. पूजा रामदास पाटील (वय ३०, व्यवसाय गृहिणी, रा. नागरदळे, ता. चंदगड) यांनी चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये १० हजार ५०० रुपये किमतीचे ७ तोळे वजनाचे चांदीचे पैंजण, ६० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, ६० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील रिंगची एक जोडी आणि ६० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र असा एकूण १ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पोलीस उपनिरीक्षक श्री. शेख तपास करत आहेत.

No comments:
Post a Comment