हलकर्णी / प्रतिनिधी
आमरोळी (ता. चंदगड) येथील युवा समाजिक
कार्यकर्ते नितेश नाईक यांनी आपल्या वाढदिवसाचे निमितावर महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या समाजासाठी प्रयत्नशील असणाऱ्या विचारानां
प्रभावी होऊन आपण मनसेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी प्रवेशावेळी सांगितले.
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष सत्वशिल पाटील, मनसे
विद्यार्थी सेना तालुकाअध्यक्ष राज सुभेदार, उपतालुका
अध्यक्ष अमर कांबळे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यासोबत जाहीर प्रवेश केला. यावेळी विकी मनगुतकर व मनसेचे
तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment