![]() |
कार्वे (ता. चंदगड) येथे महाडिक युवा शक्ती शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक, व्यासपीठावर भरमूआण्णा पाटील, एम. जे. पाटील व इतर. |
मजरे कारवे / प्रतिनिधी
तुम्ही सर्वांनी मला खासदार केला तेव्हापासून
ग्रामीण व शहरी भागांचा अभ्यास करून १०२२ प्रश्न संसदेत
विचारले म्हणून मला `संसदरत्न
पुरस्कार मिळाला` हा तमाम
जिल्ह्यातील जनतेचा सन्मान आहे. चंदगड तालुक्याने नेहमीच मला सहकार्य केले आहे. येणाऱ्या आगामी लोकसभेला अशीच साथ द्या असे आवाहन खासदार धनंजय
महाडिक यांनी केले. कार्वे (ता. चंदगड) येथील महाडिक युवा शक्ती शाखा उद्घाटन
प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष माजी रोहयो मंत्री भरमू आण्णा पाटील होते.
प्रास्ताविक निंगाप्पा बोकडे यांनी केले. महाडिक
युवा शक्ती शाखा कार्वेचे अध्यक्ष तानाजी बोकडे यांनी मजरे कार्वे येथील स्मशान
भूमीकडे जाणारा रस्ता, शिवाजी पुतळा सुशोभीकरणासाठी निधी व शिवाजी
पुतळ्यासमोरील विद्युत डिपी हलवण्यासाठी संबंधीत खात्याला आपल्याकडून आदेश व्हावेत
अशी विनंती मनोगतातून व्यक्त केल्यानंतर आदेश व निधी देण्याचे आश्वासन दिले.
व्यासपीठावर रामराजे कुपेकर, एम. जे. पाटील, अजित
व्हन्याळकर, खेडूतचे संचालक
गोपाळ बोकडे, मारूती बोकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आभार दिपा बोकडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment