![]() |
मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथे शहाजी सूर्याजी नाईक यांच्या वाढदिवस प्रसंगी आयोजित मेळाव्यात बोलताना उद्योगपती रमेशराव रेडेकर व इतर मान्यवर. |
गडहिंग्लज / प्रतिनिधी
आपले प्रेम, विश्वास आणि
समोरील गर्दी हे सर्व आमच्या हातून सहजपणे थोड्याफार प्रमाणात घडलेल्या सामाजिक
कामाची पोहोचपावती आहे. कार्यकर्त्याचे सुख-दुःख हे आम्ही आमचे मानतो. त्यामुळे
कार्यकर्त्याचा वाढदिवस हा आमच्यासाठी कौटुंबिक सोहळा असतो, असे मत उद्योगपती रमेशराव
रेडेकर यांनी व्यक्त केले. कार्यकर्ता शहाजी सूर्याजी नाईक यांच्या वाढदिवस
प्रसंगी मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
श्री. रेडेकर म्हणाले,``गरिबी आणि जीवनातील अडचणींची आम्हाला
जाणीव आहे. माझे जीवन म्हणजे संघर्षच आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या आणि गरजू माणसाची मानसिकता आम्ही समजू शकतो. यासाठी रेडेकर परिवाराकडे आलेल्या कोणलाही आम्ही मोकळ्या हाताने जाऊ
देत नाही. आमच्या कुवतीप्रमाणे आर्थिक, मानसिक
किंवा इतर कोणतेही सहकार्य लागत असेल तर आमच्या परिवाराचे दरवाजे २४ तास उघडे
असतात. मला वडिलोपार्जित वारसा हक्कात इस्टेट, सहकारी संस्था, राजकीय
वारसा नाही मिळाला. आयुष्यात जे मिळाले ते स्वकष्टाने, मला
असाच संघर्ष करणारा जिद्दीने आपल्या क्षेत्रात यशस्वी होणारा तरुण घडवायचा आहे.
आपला देश हा युवा शक्तीचा देश आहे या शक्तीचा संघटीतपणे योग्य वापर झाल्यास
प्रत्येक गाव, घर आणि पर्यायाने संपूर्ण समाज सुखी होवून देश मजबूत
होईल. हि गर्दी म्हणजे निव्वळ प्रेम नाही तर आपण दाखविलेला विश्वास आहे. या
विश्वासास मी सदैव पात्र राहीन असे सांगितले. यावेळी मुत्नाळचे माजी सरपंच
सूर्याजी नाईक, आदित्य रेडेकर, संजय रेडेकर, वीरेंद्र
चौगुले, संजय कांबळे, संजय बटकडली, गणपत
डोंगरे, उमेश रेमजी आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment