मतदार यादी दुरुस्तीसाठी अंजुमन ट्रस्टचे तहसीलदाराना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2018

मतदार यादी दुरुस्तीसाठी अंजुमन ट्रस्टचे तहसीलदाराना निवेदन

चंदगड शहरातील मतदार यादी दुरुस्त करावी. या मागणीचे निवेदन तहसिलदार यांना देताना अंजुमन-ए-ईस्लाम ट्रस्टचे पदाधिकारी

चंदगड / प्रतिनिधी -
चंदगड शहरातील मतदार यादीत दोष दिसत असल्याने मतदार यादीची  दुरुस्ती करावी अशा मागणीचे निवेदन अंजुमन-ए-ईस्लाम ट्रस्टच्या वतीने चंदगडचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांना यांना देण्यात आले.
गुगल प्रमाणे प्रभाग रचना केली गेली. ती पूर्णपणे चुकीची अशून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांना एकत्र करुन प्रभाव रचना केली असून ती दुरुस्त करावी. मतदार याद्या तयार करताना जो मतदार ज्या प्रभागात रहिवाशी आहे. त्याच प्रभागात कायम ठेवणेसाठी मागील सर्वेमध्ये सांगणेत आले होते. जे नव मतदार आहेत. त्यांचे नावे सर्व मतदार याद्यामध्ये विभागून नोंद केली आहे. ती नावे ज्या प्रभागात कायम रहिवाशी त्याच प्रभागात नोंद करावी. चंदगड शहराच्या सद्याच्या मतदार यादीत चुका दिसतात. त्यामध्ये मतदार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणीच्या प्रभागाच्या यादीत त्या मतदाराचे नाव हवे. मात्र चंदगड शहरातील नव्या मतदार यादीत काही मतदारांची नावे राहत्या प्रभागा ऐवजी दुसऱ्या ठिकाणी आहेत. मतदार यादी दोषपूर्ण असल्याने त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार चंदगड यांच्याकडे निवेदनातुन केली आहे. निवेदनावर अंजुमन ट्रस्टचे अध्यक्ष तजमुल फणीबंद, उपाध्यक्ष अल्ताफ मदार, झाकीर नाईक,गुलजार शेख, सल्लाऊद्दीन सय्यद, सिकंदर नाईक, गणी मुल्ला, राहुल धुपदाळे, शानुर मदार आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment