कोवाड /
प्रतिनिधी
सत्कार हा व्यक्तिला नवे कार्य करण्याची
प्रेरणा देते. मला मिळालेले जिल्हा बँकेचे संचालक पद व चंदगड तालुका संघाला
मिळालेला सहकार भुषण पुरस्कार हा तुम्हा सर्वांचा आशिर्वाद व तालूका संघाच्या
कर्मचाऱ्यांचे योगदान आहे. हे पुरस्कार मला चांगले कार्य करण्यास प्रवृत्त करतील असे
विचार जिल्हा बँकेंचे संचालक व तालुका संघाचे चेअरमन राजेश पाटील यांनी व्यक्त
केले. किणी कर्यात भागातील सर्व ग्रामपंचायती, सेवा
संस्था, पतसंस्था, विविध मंडळे यांच्या
मार्फत सत्कार प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक बाळ देसाई
होते.
प्रास्ताविक वसंत जोशिलकर यांनी केले. यानंतर
सुरेशराव चव्हाण-पाटील यांच्या हस्ते केडीसी संचालकपद व संघाला सहकार भूषण
पुरस्कार मिळवल्याबद्दल किणी कर्यात भागाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
याबरोबरच कोवाड ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. अनिता भोगण यांच्यासह सदस्यानी
सत्कार केला. परिसरातील विविध संस्था, मंडळे
यांनीही राजेश पाटील यांचा सत्कार केला. यावेळी राजेश पाटील म्हणाले, ``संघाला
जसा नावलौकीक प्राप्त झाला आहे. तसा बंद
पडलेल्या दौलतला पुन्हा चालू करण्यासाठी सर्व राजकीय गटांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आमदारकी महत्त्वाची नसून दौलत साठी सर्वताकद देणे महत्वाचे आहे. मिळालेल्या
संधीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी करणार असल्याचे सांगितले.``
यावेळी दिग्विजय देसाई, श्रीमती श्रीमंता सलाम, बाळासाहेब
कोकितकर, सरेशराव चव्हाण-पाटील, अशोक बाळ देसाई यांची
मनोगते झाली. यु-मूम्बा कब्बडी संघामध्ये समाविष्ट होऊन सर्वोकृष्ठ कामगिरी करत
असलेल्या हुंदळेवाडी येथील सिध्दार्थ देसाई यांचे वडिल शिरीश देसाई यांचाही सत्कार
झाला. या कार्यकमाला विष्णू आढाव, पोमाना पाटील, मारूती कांबळे, पी. एस. भोगण
यांच्यासह परिसरातील जवळपास तीस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन
प्रा. डॉ. मोहन घोळसे यांनी केले तर आभार सुर्यकांत पाटील यांनी मानले.
पत्रकारांच्यामुळे
दौलतचा विषय टिकून
पत्रकार दौलतच्या संदर्भात चांगले लिखान
करत आहेत. त्यामुळे पत्रकारांच्यामुळे दौलतचा विषय जीवंत आहे. दौलतसाठी सर्वा
राजकीय नेत्यांनी एकत्र येवून दौलत सुरु करुन तालुक्याचे पुर्वीचे सोनेरी दिवस
दाखवावेत अशी भावना पत्रकारांची आहे.
![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने राजेश पाीटल यांचा सत्कार करताना सरपंच सौ. अनिता भोगण, जि. प. सदस्य कल्लापा भोगण, उपसरसपंच विष्णु आढाव, सदस्य पी. एस. भोगण.
|