चंदगड / प्रतिनिधी
बेळगाव-वेगुर्ला मार्गावर दाटे (ता. चंदगड) जवळ
दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात एकजण ठार तर दोन जखमी झाले. चंदन
हरेराम मेहता (वय-23, रा. नेपाळ, सघ्या रा. बेळगाव)
असे मयताचे नाव आहे. संदिप धोंडिबा पाटील (वय -29, रा. बोंजुर्डी, ता. चंदगड) व
संदिप शंकर मासरणकर (वय-31, रा. सातवणे, ता. चंदगड) हे दोघे जखमी झाले आहेत. आज
सकाळी साडेदहा वाजता हा अपघात घडला.
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीत अशी – चंदन
मेहता हे बेळगाव येथील केएलइ रुग्णांलयाच्या वसतिगृहात वास्तव्याला आहेत. चंदन आपल्या
हिरो होंडा सीबीझेड मोटरसायकलवरुन (केए-49, के.
6428) बेळगावच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोरुन प्रविण पाटील व संदिप मासरणकर
हे दोघे आपल्या मोटरसायकलवरुन (एम. एच. 09, बी. यु. 7715) चंदगडच्या दिशेने जात
होते. दोघेही मोटरसायकलचालक दाटे जवळील वळणावर आल्यानंतर दाटे येथे आल्यानंतर चंदन
मेहता यांनी समोरुन येणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती
की, यामध्ये समोरील मोटरसायकलवरील दोघेजण जखमी झाले. तर चंदन मेहता हे यांच्या
डोकीला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. दाटे येथील आंब्याच्या झाडाजवळील
वळणावरील रस्त्यावर हा अपघात झाला. अपघातातील जखमींच्यावर चंदगड येथील ग्रामीण
रुग्णांलयात उपचार करण्यात आले. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. ना.
श्री. पोवार तपास करत आहेत.