शिवसेनेच्या वतीने चंदगड रवळनाथ मंदिरात राम मंदिरसाठी महाआरती - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2018

शिवसेनेच्या वतीने चंदगड रवळनाथ मंदिरात राम मंदिरसाठी महाआरती

चंदगड - शिवसेनेच्या वतीने चंदगड रवळनाथ मंदिरात राम मंदिरसाठी महाआरती करण्यात आली.
चंदगड / प्रतिनिधी -
चंदगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने चंदगड, गडहिंग्लज, आजरा येथील राम मंदिर व रवळनाथ मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते.  हिंदूचे आराध्य दैवत श्री रामाचे मंदीर अयोध्या येथे बांधण्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे. यासाठी आपल्या कुटुंबासह हजारो शिवसैनिका समवेत शरयू नदीच्या काठावर तमाम देशवाशीय महाआरती करत आहेत. याचाच एक भाग म्हणून  चंदगड येथील रवळनाथ मंदिरात महाआरती करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, संपर्क प्रमुख विधानसभा अशोक निकम, तालुकाप्रमुख अनिल दळवी, महिला जिल्हा संघटक सौ. संज्योती मळवीकर, उपजिल्हा महिला संघटक शांता जाधव, विधानसभा महिला संघटक श्वेता नाईक, महिला तालुका संघटक शारदा घोरपडे, युवा तालुका प्रमुख पिणु उर्फ प्रताप पाटील, शहर प्रमुख विशाल गायकवाड, वाहतूक सेनेचे संतोष पाटील, माजी तालुका अध्यक्ष रंजित भोसले, युवा शहर प्रमुख शरद गावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कांबळे, उपतालुका प्रमुख उदय मंडलिक, प्रदीप पाटील, सरपंच चंद्रकांत शिवणगेकर यासह शिवसेना, युवा सेवा व महिला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.