![]() |
चंदगड येथील बेथेल चर्चमध्ये सामुदायिक प्रार्थनेसाठी जमलेले बांधव. |
चंदगड / प्रतिनिधी
जगातील
सर्व माणसाना शांतता लाभावी, सर्वांना आशिर्वाद मिळावा. यासाठी बिलिव्हर
चर्च चंदगड येथे आयर्लंडमधुन आलेल्या पास्टर व्ह्युवेल क्रोझ्स यांनी विशेष
प्रार्थना केली. प्रारंभी चर्चच्या
वतीने पास्टर व्ह्युवेल यांचे प्रार्थना व पुष्पगुच्छ देऊन
स्वागत झाले. ख्रिस्ती गायने, स्तवनानंतर बायबल मधुन उपदेश करताना
जगातील मानवाला या युगात शांती व आशिर्वाद हवा आहे. यासाठी देवावर श्रद्धा असणे
गरजेचे आहे. जीवनात केलेल्या पापांचे प्रायश्चित
करुन देवाला शरण जावे असे सांगुन विविधतापूर्ण भारत देशातील ऐक्यामुळे जगात भारत
देश वैशिष्ट्यपूर्ण माणला जातो असा उल्लेख पास्टर व्ह्युवेल क्रोझ्स यांनी केला. शेवटच्या
प्रार्थनेनंतर रीट्रेटची समाप्ती झाली.