मजरे
कारवे/ प्रतिनिधी:
तडशिनहाळ (ता.
चंदगड) येथील अष्टविनायक क्रिकेट क्लब यांच्यावतीने सोमवार 26 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी आठ वाजता हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 5001 रुपये व चषक, दुसरे बक्षीस 4001 रुपये व चषक तर तिसरे बक्षीस 2001 रुपये व चषक ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा सात खेळाडूंची असणार असून
हौशी क्रिकेट संघाने या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन क्लबच्या वतीने करण्यात
आले आहे.