भगतसिंग गावडेला बेळगाव येथील जलतरण स्पर्धेमध्ये सुवर्णपदक - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2018

भगतसिंग गावडेला बेळगाव येथील जलतरण स्पर्धेमध्ये सुवर्णपदक

बेळगाव :-भगतसिंग गावडे याला सुवर्णपदक देऊन सन्मानित करताना मान्यवर

मजरे कारवे /प्रतिनिधी
हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील भगतसिंग अकॅडमीचे संचालक भारत गावडे यांचे पुत्र भगतसिंग भारत गावडे याने बेळगाव येथे नुकत्याच झालेल्या `सिल्वर जुबिली स्विमिंग चॅम्पियनशिप`मध्ये सुवर्णपदक मिळवले. 25 मिटर फ्रीस्टाइल व 25 मिटर बॅकस्ट्रोक प्रकारात त्याला सुवर्णपदक मिळाले. त्याला मेडल, एक हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भगतसिंगला प्रशिक्षक अजिंक्य अतुल व श्री. ओंकार  यांचे मार्गदर्शन लाभले.