कालकुंद्री येथे ट्रॉलीचे चाक तुटून ऊसाने भरलेली ट्रॉली उलटली, सुदैवाने जिवीतहानी नाही - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2018

कालकुंद्री येथे ट्रॉलीचे चाक तुटून ऊसाने भरलेली ट्रॉली उलटली, सुदैवाने जिवीतहानी नाही

कालकुंद्री (ता. चंदगड) येथे घडलेल्या अपघातातील ट्रॉली व रस्त्यावर पडलेला ऊस.

कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री-कागणी मार्गावर कालकुंद्री (ता. चंदगड) येथील विदा सावरकर नगर क्रॉस वर किणी येथून ओलम हेमरस साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक तुटून ट्रॉली पलटली. यामुळे भरलेला पूर्ण उस रस्त्यावर कोसळून मार्ग काही वेळ बंद झाला. रात्री उशिरा ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. याच ठिकाणी विरुद्ध बाजूस शाळेच्या मैदानाचे प्रवेश द्वार असल्याने शालेय वेळेत मुलांची वर्दळ असते. अपघात ग्रस्त ट्रॅक्टर ट्रॉली किणी येथील असल्याचे समजते. ट्रॉलीच्या चाकाचे नटबोल्ट तुटून चाक बाहेर आल्याने अपघात घडला. यात ऊस रस्त्यावर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.