किणी येथील नेत्र तपासणी शिबीरामध्ये अडीचशे जणांनी तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2018

किणी येथील नेत्र तपासणी शिबीरामध्ये अडीचशे जणांनी तपासणी

किणी (ता. चंदगड) येथील नेत्रतपासणी शिबीरात रुग्णांची अशी रांग लागली होती.


कोवाड / प्रतिनिधी
किणी (ता. चंदगड) येथे शिनोळी येथील ऑर्लीकॉन फेअरफिल्ड अॅटलास कंपनी, बेळगाव येथील सिद्धार्थ नेत्रालय व किणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबीर झाले. शिबीरात २५० रुग्णांची तपासणी झाली. सरपंच वसंत सुतार यांच्या अध्यक्षस्थेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी दहा वाजता शिबीराल प्रारंभ झाला. वसंत जोशिलकर यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच पुंडलिक हुंदळेवाडकर यांनी स्वागत केले. डॉ. सिद्धार्थ पुजारी यांनी रुग्णांची नेत्र तपासणी करुन उपचार केले. शिबीरात तपासणी झालेल्या रुग्णांना सवलीतीच्या दरात चष्मे दिले जाणार असून शस्त्रक्रियेच्या रुग्णांनाही याचा लाभ मिळणार असल्याचे डॉ. पुजारी यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक पांडुरंग मोहनगेकर, पुंडलिक नौकुडकर, निंगाप्पा मोटूरे, नारायण मोटूरे उपस्थित होते. ग्रामसेवक दत्तात्रय नाईक यांनी आभार मानले.