अनिल धुपदाळे, चंदगड
चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयातील वादग्रस्त ठरलेल्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस. एस. पाटील यांची अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या ठिकाणी झाली आहे. याबाबत चा आदेश आरोग्य मंत्रालयातून निघाला आहे. चंदगड ग्रामीण रुग्णांलयातील डॉ. एस. एस. पाटील यांच्या कारकिर्दीत दोन घटना वादग्रस्त ठरल्या होत्या. याबाबत भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन पिळणकर यांनी आवाज उठवला होता. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले.
गेल्या वर्षी ग्रामीण रूग्णांलयातील ऑक्सिजण सिलेंडर व या वर्षी ईदची सार्वजनिक सुट्टी या दोन्ही विषयाबाबत त्यांच्या विरोधात तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे त्याच्या बदलीची मागणी झाली होती. रुग्णांलयात ईदच्या सुट्टीचा फलक लागला होता. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता कानावर हात ठेवले होते. त्याउलट प्रसिद्धी पत्रकाव्दारे ग्रामीण रूग्णांलयात या दिवशी तब्बल नऊ ऑपरेशन केल्याचे सांगितले होते. या दोन्ही प्रकरणामुळे चंदगडच्या ग्रामीण रूग्णांलयाचा कारभार चर्चेत आला. त्याचे पडसाद तालुक्यात उमटले. भाजपा जिल्हा युवा उपाध्यक्ष सचिन पिळणकर यांनी हे प्रकरण धसास लावुन धरल्यानंतर याबाबत आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमुन पाहणी केली व वरिष्ठांना अहवाल दिला होता. या अशा दोन विषयामुळे डॉ. एस. एस. पाटील विशेष चर्चेत आले होते. अखेर डॉ. पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील ग्रामीण रूग्णांलयात बदली झाली आहे. याबाबत चा आदेश निघाला आहे.