![]() |
गौळवाडी ते ढोलगरवाडी रस्त्याची झालेली दुरावस्था. |
मजरे कारवे / प्रतिनिधी
गौळवाडी ते ढोल गरवाडी दरम्यानच्या रस्त्याची
अवस्था दयनीय झाली असून रस्त्यावरील डांबर दिसेनासे झाले आहे. लहान ल-हान खड्यांचा
व्यास दिवसे दिवस वाढत आहे. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालविणे
जिकरीचे होत आहे. रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने
दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
कोवाड, किणी, होसूर, करेकुंडी, सुंडी
या गावांना जाण्यासा-ठी हा रस्ता जवळचा असल्यामुळे या मार्गावर चंदगडहून येणाऱ्या
वाहनांची वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम खाते गांधारी सारखी डोळ्याला पट्टी बांधून
वाहनधारकांची होणारी कुचंबणा किती दिवस पाहत राहणार असा संतप्त सवाल नागरीकांच्या
कडून विचारला जात आहे.
No comments:
Post a Comment