कालकुंद्री येथे वडिलांच्या वर्षश्राद्ध निमित्त वाचनालयाला पुस्तके दान - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2018

कालकुंद्री येथे वडिलांच्या वर्षश्राद्ध निमित्त वाचनालयाला पुस्तके दान

कालकुंद्री (ता. चंदगड) येथे वडिलांच्या वर्षश्राद्ध ला वाचनालयला पुस्तके देताना पाटील कुटुंबीय.

कालकुंद्री / प्रतिनिधी
आई-वडिलांच्या वर्ष श्राद्धला जेवणावळी घालण्याची प्रथा आपण बहुतांशी ठिकाणी पाहतो. पण आई-वडिलांच्या वर्षश्राद्ध तथा पुण्यस्मरण दिनी जेवणावळी कार्यक्रमाला फाटा देत विधायक उपक्रम राबवणारे पुत्र व कन्या अपवादाने पाहायला मिळतात. असाच उपक्रम कालकुंद्री (ता. चंदगड) येथील पप्पू पाटील व रवी पाटील या बंधूंनी आपले वडील बाळू ज्योती पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी राबवत गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयला ग्रंथ पुस्तके दान करून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. या उपक्रमातून समाजाने प्रेरणा घेण्याची गरज आहे.
स्वागत वाचनालय अध्यक्ष के. जे. पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. व्ही. आर. पाटील यांनी केले. यावेळी बाळू पाटील यांचे बंधू एम. जे. पाटील, तहसीलदार तेजस्विनी पाटील, प्रा. एम. के. पाटील, झेवियर क्रूज आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी नारायण जोशी, श्रीकांत पाटील, दीपक कालकुंद्रीकर, अर्जुन पाटील, प्रभाकर कोकितकर, नारायण पाटील, रवळू कांबळे, आनंद पाटील, पी. एस. कडोलकर, युवराज पाटील, प्रा. रवी पाटील आदींसह पाटील कुटुंबीय वाचनालय सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. आभार शिवाजी खवणे वाडकर यांनी मानले.



No comments:

Post a Comment