कोवाड येथे मासिक पाळी व्यवस्थापन तालुकास्तरीय प्रशिक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2018

कोवाड येथे मासिक पाळी व्यवस्थापन तालुकास्तरीय प्रशिक्षण

कोवाड (ता. चंदगड) येथे रोपाला पाणी घालून प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ करताना श्रीकांत पाटील, ए. एस. पाटीलवाय. आर. निटूरकर व तज्ज्ञ मार्गदर्शिका आदी.
कोवाड / प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती चंदगड मार्फत मासिक पाळी व्यवस्थापन तालुकास्तरीय प्रशिक्षण श्रीराम विद्यालय कोवाड येथे सुरू झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. एस. पाटील होते. कालकुंद्री केंद्रप्रमुख व वर्गसमन्वयक वाय. आर. निटूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्या हस्‍ते उद्घाटन झाले.
प्रशिक्षणात कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींचे आरोग्य संवर्धन व मासिक पाळी काळातील अज्ञान दूर करण्यासाठी हा जागृती उपक्रम हाती घेण्यात आला. कोवाड येथील प्रशिक्षण वर्गात कालकुंद्री, कुदनुर, कोवाड, मांडेदुर्ग या केंद्रातील 52 प्राथमिक व माध्यमिक शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आदींची उपस्थिती होती. तज्ञ मार्गदर्शक म्हणून सौ. सुनिता कोरे, श्रीमती एस. आर. पाटील (उपकेंद्र कुदनुर), रंजना साळुंखे (प्रा. आ. केंद्र कोवाड), सीमा नंदावडेकर (कारवे) यांनी काम पाहिले. पं. स. चंदगडचे प्रतिनिधी म्हणून किरण पाटील उपस्थित  होते. याच प्रकारचे प्रशिक्षण 27 नोव्हेबरला कारवे, 28 नोव्हेंबरला नागनवाडी, 29 नोव्हेंबरला रोजी चंदगड येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी एस. एस. सुभेदार यांनी दिली.



No comments:

Post a Comment