![]() |
हलकर्णी (ता. चंदगड) येथे फिरते विधी सेवा केद्र व लोकअदालत कार्यक्रमावेळी उपस्थित न्यायाधीश डी. एम. गायकवाड, बार असोशिएशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ. |
हलकर्णी / प्रतिनिधी
"लोकअदालतमधुन लोकांचे प्रलबिंत दावे
सामोपचाराने मिटविण्यासाठी फिरते लोक न्यायालय तुमच्या दारी ही संकल्पना सर्वासाठी
आहे. याचा फायदा गावातील वादी-प्रतिवादी यांनी करून घ्यावा. वेळ व पैसा याची बचत
करुन माणसिक तणावातुण बाहेर पडावे" असे प्रतिपादन न्यायाधीश डी. एम. गायकवाड
यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई
यांच्या निर्देशानुसार चंदगड तालुका विधी सेवा समिती मार्फत लोकअदालत
कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी स्वागत हलकर्णी ग्रामपंचायतीचे
ग्रामसेवक दयानंद मोटुरे यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच गोविंद आवडण यांनी केले.
भारताचे संविधान उद्देशिकाचे पुजन करुन सन्मान दिवस साजरा करणेत आला. गटविकास
अधिकारी आर. बी. जोशी यांनी संविधान दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. २६/११ च्या
दहशतवादी हल्यात मुत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरीकांना व पोलिस जवांनाना सदर
कार्यक्रमात श्रध्दाजंली वाहण्यात आली. यावेळी बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. सुरुतकर, अॅड.
विजय कडुकर, अॅड. एस. एस. पाटील, अॅड.
ए. एस. काबंळे, अॅड. एस. के. सावंत, अॅड.
संदिप पाटील, सोमनाथ गवस, ग्रामपंचायत
सदस्य सुरेश केसरकर, सुरेश भातंकाडे, शिवाजी नाईक, सौ.
रेणुका नाईक, तटांमुक्त समितीचे सुरेश गायकवाड, गोपाळ
आवडण, मनोहर सावंत, मारूती सावंत, गावातील
वादी-प्रतिवादी उपस्थित होते. आभार सुरेश भातकांडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment