ऊसतोड कामगारांची शाळाबाह्य मुले गुडेवाडी विद्यालयात दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2018

ऊसतोड कामगारांची शाळाबाह्य मुले गुडेवाडी विद्यालयात दाखल

गुडेवाडी (ता. चंदगड) येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात ऊसतोड मंजुरांच्या मुलांचे स्वागत करताना शिक्षक.

दौलत हलकर्णी
चंदगड तालुक्यात हेमरस व नलवडे या दोन्ही साखर कारखाण्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुर तालुक्यात सर्वत्र तंबु मारूण मुक्काम करत आहेत. त्यामुळे अशा ऊस तोड करणाऱ्या मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्याच्या पाडावर जाऊन गुडेवाडी (ता. चंदगड) येथील शिक्षकांनी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
रात्रंदिवस ऊसतोड करून कुटुंबाचा चरीतार्थ चालविण्यासाठी हे मजुर आपले गाव घर सोडून शेकडे मैल लांब कारखान्याच्या ठिकाणी येऊन वास्तव्य करतात. महाराष्ट्रात साखर कारखाने जिथे सुरु तिथे जायचे व परत आपल्या गावी यामुळे या ऊस तोड मजुरांच्या कुटुंबासोबत असणाऱ्या लहान मुलाचीं शैक्षणिक परीस्थिती बिघडते. ती शाळेपासून वंचित राहतात. अशिक्षित राहिल्याने पुढे ते आपल्या कुंटुबाचा चालत आलेला ऊस तोड व्यवसायाकडे वळतात. हे सर्व गुडेवाडी (ता. चंदगड) येथील स्वामी विवेकानंद विद्यालय च्या शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी गुडेवाडी परीसरात ऊस तोड करायला आलेल्या मजुरांच्या कु. राजू पांडे, कु. अजित पवार (रा. कासोळा, जि. यवतमाळ) ह्या शाळाबाहय मुलांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणले. त्यानां पुस्तकी शिक्षणाबरोबरच संगणक, हॉलीबॉल, कब्बडी, फुटबॉल याचे देखिल शिक्षण दिले जात आहे. आज शाळेतील मुलांनी आपल्याकडील वही पेन पुस्तके देऊन त्यांना आपले मित्र बनविले. तालुक्यातील उसतोडीला हातभार लावणाऱ्या या कुटूंबातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम शाळा करीत आहे. यावेळी मुख्याध्यापक जी. व्ही. गावडे, शिक्षक एस. बी. पाटील, यु. एस. कपिलेश्वरी, ए. एन. गावडे, एल. पी. पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

2 comments:

Post a Comment