ग्रामीण रूग्णांलयाचे अधिक्षक डॉ. पाटील यांच्या जागी डॉक्टर नेमण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2018

ग्रामीण रूग्णांलयाचे अधिक्षक डॉ. पाटील यांच्या जागी डॉक्टर नेमण्याची मागणी



अनिल धुपदाळे, चंदगड
चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एस. पाटील यांची चंदगड येथून कणकवलीला बदलीचा आदेश प्राप्त झाला आहे. त्यांच्या बदलीनंतर चंदगड तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. डॉ. पाटील यांच्याविरोधात झालेल्या तक्रारी लक्षात घेता जिल्हा शल्यचिकत्सक यांनी प्राप्त झालेला अहवाल सरकारकडे डॉ. पाटील यांच्या बदलीसाठी माहिती सादर करण्यात आली. त्यानंतर पाटील यांच्या बदलीचा आदेश झाला.
डॉ. पाटील यांच्या विरोधात गंभीर तक्रारी झाल्यानंतर त्यांच्या बदलीचा निर्णय चौकशी अहवाल सादर झाल्यावर घेण्यात आल्याचे त्यांच्या बदली आदेशानुसार स्पष्ट होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर एका दैनिकातील बदली झाल्याबाबत बाजू सावरण्याचा एका भ्रष्ट प्रव्रुतीची पाठराखण करण्याचा का प्रयत्न करावा, याचे मात्र आश्चर्य वाटते. चंदगड तालुक्यातील जनता नेहमीच अन्याया विरोधात लढाई करते. त्याची कित्येक उदाहरणे आहेत. चंदगड ग्रामीण रुग्णालय, ए. व्हि. एच. कंपनीविरोधातील लढा, तालुक्यातील गुंडगिरी, दौलत कारखाना वाचवण्यासाठीचे प्रयत्न असो किंवा अलीकडील चंदगड नगरपंचायतसाठीचा लढा असो या सर्व लढ्यातुन तालुक्यातील जनता नेहमीच अपप्रव्रुती विरोधात लढा देते. चांगल्या व्यक्तींचे नेहमीच कौतुक करते. हा चंदगड तालुक्यातील जनतेचा इतिहास आहे. चंदगड तालुक्यात काही अधिकारी चांगल्या पद्धतीने अगदी वीस-वीस वर्षे सेवा केल्याची उदाहरणे आहेत. अगदी याच ग्रामीण रुग्णांलयात सेवा करणारे डॉ. खोत, डॉ. साने यांची उदाहरणे देता येतील. शासनाने डॉक्टरना खाजगी प्राक्टिसची मुभा दिल्याने फावल्या वेळी ते खाजगी काम करु शकतात याचा अर्थ ते मनमानी करू शकत नाहीत. किंवा जनतेला लुबाडू शकत नाहीत. आँक्सिजन सिलेंडरचा गैरवापर, ईदच्या सुट्टचे प्रकरण यातुन कार्यपद्धती स्पष्ट होते. या ठिकाणी एम. डी. डॉक्टर उपलब्ध होणार नाही हे कारण पसरवण्यासाठी काय कारण असावे कळत नाही. आता तर शासनाने ग्रामीण भागात सेवा केलीच पाहिजे, असा नियम केला आहे. याचा अर्थ डॉक्टर उपलब्ध करणे ही शासनाची जबाबदारी आहे. अधिक उपचारासाठी एकशे आठ या सेवेच्या माध्यमातुन पेशंटना संदर्भ दिली जात आहे. गंभीर आजारावर पेशंट शक्यतो जवळच्या शहराकडे जातो. गोर गरिबच सरकारी दवाखान्यात जातात. मात्र अशा ठिकाणी स्वतःच्या फायद्यसाठी सगळे नियम धाब्यावर बसवून मी त्यातला न्हवे असा आव आणणे व एकाने सावरण्याचा प्रयत्न करणे हे सामाजिक द्रुष्ठ्या समाजाला हानीकारक ठरते. आरोग्य विभागाने चंदगड ग्रामीण रुग्णांलयाला बदली डॉक्टर त्वरित द्यावा अशी मागणी चंदगड वाशियातून होत आहे.

No comments:

Post a Comment