![]() |
चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा या मागणी साठी आज विधान भवनाच्या दारात आम. सतेज पाटील, आम. हसन मुश्रीफ, आम. संध्यादेवी कुपेकर यांनी घोषणाबाजी केली. |
चंदगड
/ प्रतिनिधी
चंदगड
ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा या मागणी साठी आज विधान भवनाच्या दारात
आम. सतेज पाटील, आम. हसन मुश्रीफ, आम.
संध्यादेवी कुपेकर यांनी घोषणाबाजी केली. चंदगडला नगरपंचायत व्हावी यासाठी गेले
वर्षभर सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते विविध स्तरावरून प्रयत्न करत
आहेत. हुपरी आणि आजरा या ग्रामपंचातीना नगरपंचायतीचा दर्जा देऊन निवडणुकाही
घेण्यात आल्या. मात्र चंदगड
ग्रामपंचायतीला तांत्रिक कारण दाखवून नगरपंचायतीचा दर्जा दिला नव्हता. आम. सतेज पाटील, आम. कुपेकर यांनी याबाबत लक्षवेधीही
उपस्थित केली होती. दरम्यान काल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी चंदगडला
नगरपंचायतीचा दर्जा द्यावा असे पत्र मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना दिले आहे.
त्यामुळे या मागणीला जोर आला आहे. आज विधान भवनाच्या दारात हातात फलक घेऊन तिन्ही
आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
No comments:
Post a Comment