चंदगड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले. |
चंदगड / प्रतिनिधी
सरकारने ओबीसी कोट्याला धक्का न लावता कोटा वाढवून मराठा समाजाला
ओबीसी प्रवर्गातून 16 टक्के कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण द्यावे. मराठा
क्रांती मोर्चाचे समन्वयकांना केलेल्या अटकेचा निषेध यावेळी नोंदविण्यात आला. यासाठी
सकल मराठी समाजाच्या वतीने चंदगड येथील संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले. सकल
मराठा समाज अध्यक्ष सुरेश सातवणेकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयावर वाहन
मोर्चा साठी जाणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली पोलीस
बळाचा वापर करून मराठ्यांचा आवाज दाबू पाहणाऱ्या शासनाचा चंदगड शहर सकल मराठा
समाजाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात आला. यावेळी अध्यक्ष श्री. सातवणेकर, संतोष
घवाळे, डॉ. देवकुमार सुर्यवंशी यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मराठा आरक्षणा
घेतल्याशिवाय मराठा स्वस्थ बसणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचे असल्याचे सांगितले. डॉ.
परशराम गावडे, शरद गावडे, प्रा. मोहन पाटील, मनोहर
चंदगडकर, शंकर मनवाडकर, कमलाकर सावंत, प्रा.
गायकवाड, प्रा. आजरेकर, विनायक गावडे, महेश
देसाई, सम्राट देसाई, नितेश मोरे, ओंकार
चंदगडकर,पिंटू कडोलकर, गणेश मुळीक यांच्यासह सकल मराठा
समाज बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment