![]() |
| चंदगड येथील तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलनावेळी प्रहार अपंग संघटनेचे पदाधिकाी. |
चंदगड / प्रतिनिधी
प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने
अपंगाच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर 10 डिसेंबर 2018 रोजी पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस असून सोमवारी (ता. 17) रोजी तीव्र
आंदोलन करणार असल्याचा इशारा अपंग संघटनेचे अध्यक्ष जोतिबा गोरल यांनी दिला आहे. अंध, अपंग, अनाथ, विधवा परितक्त्या,
निराधार, दुर्धररोगी यांच्या अत्यावश्यक गरजा पैकी निर्वाहभत्ता निवारा
वस्त्र शिक्षण उपचार प्रवास सेवा रोजगार सुरक्षा इत्यादी विषयांसाठी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मिळावी म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन
दिले होती. मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. म्हणून बेमुदत धरणे आंदोलन तहसील कार्यालय चंदगड येथे सुरू केले
असल्याचे श्री. गोरल यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment